परिवर्तन यात्रा रविवारी तळेगाव दाभाडेत !

0

राष्ट्रवादीचे बबन भेगडे यांनी दिली माहिती

तळेगाव दाभाडे- परिवर्तन झालेच पाहिजे. हे सरकार गेलेच पाहिजे, हा संदेश घेऊन निघालेल्या परिवर्तन यात्रेचे आगमन तळेगाव दाभाडे शहरात दि. 3 रोजी होणार असल्याची माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे व तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी दिली. या परिवर्तन यात्रेत व सभेला राज्यातील तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभा माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, मावळ तालुका पक्ष निरीक्षक विजय कोलते आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी सहभागी व्हावे
या सभेत केंद्र व राज्य शासनाने अत्तापर्यत केलेल्या घोषणा पूर्ण न झाल्याने त्यापासून नागरिकांना होणारा मनस्तापाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये जीएसटी, गॅस, पेट्रोल, डीझेल दरवाढ, शेतीमालाला भाव न मिळणे, बेरोजगारांना नोकर्‍या न देणे आदी बाबीने जनता त्रस्त झाली आहे. याविरुध्द आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या परिवर्तन यात्रेचे आयोजन करणायत आले आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संश्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले. या सभेच्या नियोजनासाठी मावळ तालूक्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, शहरी, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जोमाने तयारीला लागले आहेत.