परिवर्धे माध्यमिक विद्यालयात मोफत वह्यावाटप व वृक्षारोपण

0

शहादा। तालुक्यातील परिवर्धे येथील माध्यमिक विद्यालयात प्रियंका वैद्यकीय व शैक्षणिक संस्था शहादातर्फे गरीब विधार्थ्याना मोफत वह्या वाटप व शालेय आवारात वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला.शहादा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय परिवर्धे येथे स्वर्गीय कु.प्रियंका पटेल हीच्या 25 व्या पुण्यस्मरणार्थ प्रियंका वैद्यकीय व शैक्षणिक ट्रस्टतर्फे गरीब व आदिवासी गरजु विद्यार्थाना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

सखीमंचच्या अध्यक्षा ऱिताबेन प्रदीपकुमार पटेल यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. सोबतच वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष गोविंद पाटील, उपाध्यक्ष उध्दव पाटील ,मुख्याध्यापक जगदीश पाटील व शिक्षक वृंद हजर होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रियता पटेल, ज्योती पाटील, वैशाली वसावे, दिव्या जैन ,कविता जैन, सिमा पाटील, अल्का जोंधळे ह्या सखी मंचचा सदस्या उपस्थित होत्या.