जळगाव। राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचे आरोग्या संबंधी अनेक तक्रारी असून आर्थिक अडचणीमुळे अनेक वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. कर्मचार्यांच्या आरोग्याची समस्या विचारात घेता प्रत्येक आगारात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 व 20 जून रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन होणार आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे शिबीर होणार आहे. परिवहन विभागातर्फे रुग्णालयाने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात यावे अशा आशयाचे पत्र पाठविण्यात आले होते. शिबीरात रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, सी.बी.सी. लिव्हर फंक्शन टेस्ट, मुत्रपिंडा संबंधी तपासणी, ई.सी.जी. आदी करण्यात येणार आहे. मंडळाच्या कर्मचार्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.