भुसावळ। येथील संत गाडगेबाबा भुसावळ मध्ये विद्यार्थांसाठी मुंबई येथील सीएमएस आयटी सोलूशन प्राइवेट लिमिटेड या कंपनीकडून महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थांसाठी कॅम्पस इंटरव्हुवचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रीप्लेसमेंट मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मुलाखतीसाठी लागणारे कौशल्याबाबत कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी नरेश खंडारे यांनी मार्गदर्शन केले. या कॅम्पस इंटरव्हुमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन विभागाचे 26 विद्यार्थी तर कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनीरिंग या शाखेच्या 10 विद्यार्थी अशा एकूण 36 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. वरीलपैकी 6 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून तर उर्वरित 30 विद्यार्थ्यांची शिकावू प्रशिक्षणार्थी म्हणुन निवड केलेली आहे.
विविध क्षेत्रात काम करण्याची संधी
दोन ते सहा आठवडे दरम्यानच्या परीविक्षाधिन कालवधी नंतर अंतिम चाळणी व कल परिक्षेद्वारे सीएमएसच्या विविध क्षेत्रातील प्रोजेक्टवर सदर विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात येईल. या विद्यार्थ्यांची एसोसिएट टेक्निकल इंजिनियर, टेलिकॉम इंजिनियर, आयटी टेक्निकल कोऑर्डिनेटर, हेल्प डेक्स इंजिनियर अश्या विविध प्रकारच्या पदांवर नेमणूक होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टेलिकॉम, मैन्युफैक्चरिंग, रिटेल, बँकिंग, इन्शुरन्स या क्षेत्रात काम करण्याची संधि मिळणार आहे.
विद्यार्थ्यांचे केले कौतुक
याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह, नरेश खंडारे, डॉ. गिरीष कुलकर्णी, प्रा. सचिन देशमुख, प्रा. लविना पंजवानी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह व डॉ. आर.बी. बारजिभे, डॉ. गिरीष कुलकर्णी, प्रा. दिनेश पाटील यांनी कॅम्पस मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यशस्वितेसाठी प्रा. सचिन देशमुख, प्रा. लविना पंजवानी यांनी परीश्रम घेतले.