परिस्थिती गंभीर होत आहे आरोग्य विभागाने यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा – खा उन्मेश पाटील
खासदार उन्मेश पाटील यांनी घेतला चाळीसगावातील कोरोनास्थितीचा आढावा.
चाळीसगाव – कोरोना लसीकरणासाठी फिरफिर सुरू आहे. नागरीक ट्रॉमा केअर सेंटर येथे जावून पुन्हा अंधशाळा येथे जातात. यासाठी गावात फलक लावून जनतेला दिलासा द्या. होम कॉरंटाईन रुग्णांची तपासणी काळजीपूर्वक होत नसून तशी सुचना परीसरात होत नसल्याने संबधित कोरोना रुग्ण इतरांना “प्रसाद” वाटतो ही वस्तूस्थिती आहे. आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असुन ही बाब प्रशासनाने गंभीर घ्या. आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करा असे आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले. आज खासदार उन्मेश पाटील यांनी कोरोना बाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर , तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, शैलजा मेमोरिअल हॉस्पिटल संचालक डॉ. मंगेश वाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, ग्रामीण रूग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर, पालिका ओ. एस. श्रीमती फडतरे, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.आय. पाटील, डी डी शिर्के,नगरसेवक नितिन पाटील, विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.