‘परीक्षा पे नही खिलोने पे’चर्चा; ‘मन की बात’वर राहुल गांधींची टीका

0

नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६८ व्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळीच्या ‘मन की बात’मध्ये मोदींचा लहान मुले आणि त्यांच्या खेळणीवर अधिक भर होता. लहान मुलांच्या खेळणीला ७ लाख कोटींचा जागतिक बाजारपेठ आहे. मात्र भारतीय बाजारपेठांचा यात वाटा खूपच कमी आहे. तो वाढला पाहिजे यासाठी देशातील नवउद्योजकांनी एकत्र यावे असे आवाहन मोदींनी केले. मात्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर टीका केली आहे. मोदींनी जेईई-नीट परीक्षेवर चर्चा करायला हवी होती मात्र त्यांनी खेळणीवर चर्चा केली अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

जेईई-नीट परीक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवीत असते असे सांगत काल कॉंगेसने संपूर्ण देशात आंदोलन केले. कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.