मुंबई: युजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील परीक्षा घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार कोरोनाचाय पार्श्वभूमीवर परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. दरम्यान आज राजभवनावरील एकदाच वेळी १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता यावरून शिवसेनेने राज्यपालांना लक्ष करत टोला लगावला आहे.
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
— Uday Samant (@samant_uday) July 12, 2020
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील यावरून राज्यपालांना टोला लगावला आहे. याचसंदर्भात ट्विट करताना सामंत यांनी, “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?,” असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
युजीसीकडून परीक्षा घेण्याबाबतचा आग्रह सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही. “परीक्षा घ्या, परीक्षा घ्या… हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आग्रह किती चुकीचा आहे, हे त्यांना नियतीनेच दाखवून दिले आहे असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.