मुंबई । मुंबई विद्यापीठातील निकालांना लागलेल्या ‘लेटमार्क’मुळे विद्यापीठाचे नेहमीचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा या दिवाळीच्या आधी संपतात, पण यंदा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती अफवांची. सोशल नेटवर्किंग साइट्स, विविध ग्रुप्सवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकल्याचे मेसेज आणि परिपत्रकाच्या खोट्या इमेज फिरत आहेत, पण या सर्व अफवा असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे, तसेच विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपवरून पसरतायेत अफवा
1 गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅप गु्रपवर टीवायबीएच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे पत्रक फिरत आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, नवीन वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल, असेही या पत्रकात नमूद केले आहे, पण हे पत्रक खोटे आहे.
2 विद्यापीठाने टीवायबीए अथवा अन्य कोणतीही परीक्षा पुढे ढकलेली नाही. परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते, असे विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे प्रमुख लिलाधर बन्सोड यांनी सांगितले.
3सोशल नेटवर्किंग साइट्स, गु्रप्समध्ये फिरणाजया परीक्षांच्या वेळापत्रकांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेऊ नये. विद्यापीठातर्फे काढण्यात येणारी परिपत्रके ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात, तसेच विद्यापीठ परीक्षांसदर्भातील माहिती संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाते, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.