सफाळे : विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी, तसेच वाचन व लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी राजगुरु ह.म.पंडित विद्यालय, सफाळे या शाळेत हिंदी राष्ट्रभाषा परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेस एकूण 900 विद्यार्थी बसले आहेत. दरवर्षी हिंदी राष्ट्रभाषा परिक्षेस भरघोस प्रतिसाद लाभत आहे.