परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला

A student’s mobile phone was stolen from Yaval College यावल : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीचा मोबाईल लांबवण्यात आला. परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या बॅगेतून चोरट्यांनी मोबाईल लांबवल्यानंतर
यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

परीक्षेमुळे हॉलबाहेर ठेवली बॅग
यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयांमध्ये सध्या पदवीच्या वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. यात हॉल क्रमांक 21 मध्ये पेपर देण्यासाठी पुष्पांजली भगवान राजपूत (चुंचाळे, ता.यावल) ही विद्यार्थिनी आल्यानंतर तिने परीक्षा हॉलच्या बाहेर तिची बॅग ठेवली. बॅगेत 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता मात्र परीक्षा संपल्यानंतर बॅगेत मोबाईल नव्हता. विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.