’परी’वर पाकिस्तानात बंदी

0

नवी दिल्ली : अनुष्का शर्माच्या ’परी’ या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटातून काळी जादू आणि मुस्लीमविरोधी भावना व्यक्त करण्यात आल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे एक्स्प्रेस ट्रीब्यून या वृत्तपत्राने म्हटले आहे. या चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्यांमध्ये कुराणातील आयतांचा वापर करण्यात आला आहे. याच कारणामुळे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटावर बंदी घातली आहे, असे वृत्त पाकमधील जिओ टीव्हीने दिले आहे.