भुसावळ : आरटीओ विभागाने वाहनावर केलेल्या 22 हजार रुपये दंडाची रक्कम ऑनलाइन भरण्यात आली मात्र व्यवहार अयशस्वी झाल्याचा मोबाईल संदेश मिळाला तर दुसरीकडे ही रक्कम इको बँकेतून वर्ग होऊन परीवहन विभागाकडे जमा झाली मात्र परीवहन विभागाकडून याचा परतावा मिळाला नसल्याची तक्रार भुसावळातील धीरज पाटील यांनी केली आहे.
पैशांची खात्यातून वजावट
एमएच 15 ईजी 5136 गाडीचे 22 हजार रुपये रुपये रक्कमचे दंड चालन क्रमांक एमएच 61482220810141312 हे 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साडेआठ वाजता धीरज गणेश पाटील फोन पे द्वारे ई चालान – डिजिटल वाहतूक, वाहतूक अंमलबजावणी प्रणालीवर भरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान युको बँक, भुसावळ खात्यातून 22 हजार रुपये रक्कम भरली. परीवहन आयुक्त महाराष्ट्र शासनाच्या नावाने हा व्यवहार झाला. मोबाईलवर बँकेतून पैसे कापल्याचा मेसेज आला परंतु मोबाइलवर व्यवहार अयशस्वी झाल्याचा संदेश आला. परंतु खात्यात 22 हजार रुपये रक्कम परत मिळाली नाही. बँकेत संपर्क साधला असता त्यांनी ई चालान प्रणाली किंवा स्थानिक परीवहन विभागाला संपर्क करण्यास सांगितले. कारण बँकेतून ही रक्कम ऑनलाईन प्रणालीकडे वर्ग करण्यात आली आहे. दोन अयशस्वी प्रयत्नानंतर तसेच 22 हजार रुपयांचे चलन पेटीएमने भरले आहे. ई चालान – डिजिटल वाहतूक विभाग अंमलबजावणी तक्रारीची लिंक सुद्धा बंद आहे. ई चालान – डिजिटल वाहतूक/वाहतूक अंमलबजावणी संबंधित 0120-4925505 या क्रमांकावर अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबतीत ते कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, असे सांगितले आहे. हेल्प डेस्कवर ई-मेल केला आहे पण त्यांचाही योग्य अभिप्राय मिळाला नाही. स्थानिक जळगाव प्रादेशिक परीवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. परंतु त्यांनाही राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अर्थात नॅशनल इंफॉरमॅट्रिक सेंटर कडून माहिती दिली जात नाहीय. यामुळे 22 हजार रुपयांची रक्कम भोंगळ कारभारामुळे अडकल्याची तक्रार धीरज पाटील यांनी केली आहे.
सायबर पोलिसात तक्रार करणार
11 ऑगस्ट रोजी झालेल्या अयशस्वी व्यवहाराची 22 हजार रुपयांची रक्कम आजही परत मिळाली नाही, ही एक प्रकारे नागरीकांची आर्थिक फसवणूक आहे. सायबर गुन्हा घडल्याची शंका निर्माण झाली असल्याने याबाबत लवकरच सायबर पोलिसात तक्रार करणार असल्याचे धीरज पाटील यांनी कळविले आहे.