* पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांचे मत
* प्रताप महाविद्यालयात तिन दिवसीय कार्यशाळा
अमळनेर । योग्यवेळी योग्यठिकाणी योग्य परीश्रम केले तर यशाकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची क्रमीक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचन केल्याशिवाय अपेक्षित यश संपादित करता येत नाही, असे मत पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी व्यक्त केले. प्रताप महाविद्यालयात वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा, करिअर कौन्सिलिंग सेंटर व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल अध्यक्षस्थानी होते.
यांनी घेतले परिश्रम
उपप्राचार्य तथा केंद्राचे समन्वयक प्रा.एस.ओ. माळी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्ही.एन. ब्राम्हणकर, उमेश काटे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी विनोद धनगर, विक्रीकर निरीक्षक स्वप्नील वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले मोहन पाटील, शरद सैंदाणे, भूषण पाटील, टॅक्स असिस्टंट हर्षा साळुंखे, प्रा. धीरज वैष्णव आदी प्रमुख पाहुणे होते. विजयसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विजय तुंटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. धनंजय चौधरी यांनी आभार मानले. दिलीप शिरसाठ, अजय कोळीसह सीसीएमसी च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.