नवापूर । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.ए.बी.पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव मयुर हा एअरफोर्समध्ये कार्पोरल या पदावर कार्यरत होता. दिड वर्षापासून बडोदा येथे नेमणूक झाली होती. 26 जानेवारीच्या परेडसाठी बडोदा येथे सराव करत असतांना काल सायंकाळी पाच वाजता चक्कर येऊन तो कोसळला. त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेतांना त्याची प्राणज्योत मालवली. तीन मुलांमध्ये तो ज्येष्ठ होता. कै. मयुरच्या पार्थिवावर नवापूर येथे शासकीय इतमामात आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.