भुसावळ । देशात चांगला पाऊस व्हावा तसेच सर्वत्र बंधुभाव निर्माण होऊन शांतता नांदावी, सर्व समाजात सलोख्याचे संबंध रहावेत यासाठी भुसावळसह परिसरात मुस्लीम समाजबांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली़. भुसावळ शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी 9.30 वाजता नमाज पठण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी तर प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तहसीलदार मीनाक्षी राठोड- चव्हाण, नायब तहसीलदार संजय तायडे आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
वरणगाव शहर
महिनाभरापासून सुरु असलेल्या मुस्लिम समाजाच्या रमजान महिन्याची सांगता झाली असून रमजान ईद उत्साहात सपन्न झाली. शिवाजीनगर वस्तीमधील इदगाह मैदानावर हजोरा शोएब काझी यांनी मुस्लीम बांधवानी रमजान ईदची नमाज अदा केली. याप्रसंगी एपीआय जगदीश परदेशी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक संभाजी देशमुख, राजेंद्र चौधरी, सुनील काळे, प्रमोद सावकारे, मिलींद मेढे, राजेंद्र चौधरी, राहुल इंगळे, अल्लाउद्दीन शेठ, शेख सईद, अशपाक काझी, शेख कलीम, जावेदभाई, अब्रार खान उपस्थित होते. नमाज अदा झाल्यानंतर हिंदू व मुस्लीम बांधवांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पीएसआय निलेश वाघ, प्रदिप ठुबे, हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी, नागेंद्र तायडे, जितेंद्र नारेकर व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला व घरोघरी शिरखुरम्याचे आयोजन करण्यात आले होते.
भुसावळला ईदगाह मैदानाबाहेर आमदारासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
प्रसंगी नगरपालिकेचे ग़टनेता हाजी मुन्ना तेली, भाजपा सरचिटणीस प्रा़. सुनील नेवे, मनोज बियाणी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, किरण कोलते, उल्हास पगारे, रवी सपकाळे, युवा कार्यकर्ते सचिन चौधरी, राजू सूर्यवंशी, जगन सोनवणे, आशिकखान शेरखान, प्रदीप देशमुख, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, पंचायत समिती माजी उपसभापती मुरलीधर पाटील, जे.बी. कोटेचा, दलित मित्र ललित ढिवरे आदींची उपस्थिती होती़.
मुक्ताईनगर
येथे ईदगाह मैदानावर नमाज पठणानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, तहसीलदार रचना पवार, जयपाल बोदडे, पंचायत समिती सभापती राजू माळी, योगेश कोलते, सरपंच ललित महाजन, मनोज तळेले, शेख शकिल, आसीफ बागवान यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होत़े.
सावदा येथे आमदार खडसेंनी दिल्या शुभेच्छा
येथे ईदगाह मैदानवर आमदार एकनाथराव खडसे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हापरिषद सदस्य कैलास सरोदे, जिल्हा दूध संघ संचालक जगदीश बढे, विधानसभा सहक्षेत्र प्रमुख शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंकज येवले, गटनेते अजय भारंबे, विश्वास चौधरी, सतीश बेंडाळे, अतुल नेहते, मुराद तडवी, संजय चौधरी, भाजपा शहरअध्यक्ष पराग पाटील, राजेश भंगाळे, गोपाळ नेमाडे, महेश चौधरी, सागर बेंडाळे, राहुल पाटील, गजू लोखंडे, संतोष वाघ, जितेंद्र चौधरी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
रावेर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थिती
शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांनी सकाळी 9 वाजता सामुदायिक नमाज अदा केली़. हाफिज मौलाना सईद गनी लिखी (खरगोन) यांनी सामुहिक नमाज पठण केले. माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहंमद, फैजपूर पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग, तहसीलदार विजयकुमार ढगे, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांच्यासह मान्यवर नागरिकांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या़.