लोणावळा : लोणावळा शहरातील औषध दुकाने, दवाखाने, पेट्रोल पंप आणि शाळांसह अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तसेच काही संघटनांच्या वतीने शहरात दुचाकी वरून रॅली देखील काढण्यात आल्या.
शहराच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या संघटनांच्या वतीने लोणावळा पोलीस ठाण्यात भीमा कोरेगाव प्रकरणाचा निषेध करणारे आणि दोषींवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.