पर्यायी कचरा व्यवस्थापन जागेविषयी फसवणूक

0

इंदापूर । पर्यायी कचरा व्यवस्थापन जागेविषयी इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्ष अकिताताई शहा व मुख्याधिकारी रामनिवास झंवर हे इंदापूरातील नागरिक व विरोधी पक्षांची दिशाभूल व फसवणूक करत असल्याचे स्पष्ट होत असल्याने इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षांना नगराध्यक्ष पदावर राहण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादी नगरसेवक राजश्री मखरे यांनी सांगितले.

इंदापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडणार्‍या जोतिबा मंदिर शेजारील कचरा डेपो पर्यायी जागेत स्थलांतर करणेविषयीच्या प्रश्‍नाचे घोंगडे मागील आनेक वर्षापासून भिजत पडले आहे. परंतु इंदापूर नगरपरिषद त्या विषयी गांभिर्याने लक्ष न देता सर्वसामान्य नागरीक व विरोधक यांची फसवणुक व दिशा भुल करत असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. जोतिबा मंदिर हे शहरातील सर्व समाजातील भाविकांचे धार्मिक स्थळ असून त्याचे बाजुलाच आंबेडकर नगर, अण्णाभाऊ साठे नगर, आठभाई मळा, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खासगी रुग्णांलय, रयत शैक्षणिक शाळा श्रीराम वेस चौक अशी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती या भागात वसलेली असून हजारो नागरीक कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडून फसवणूक
जागा सध्या रिकामी असल्याने त्या जागेत कचरा डेपो स्थलांतर करण्यास कोणतीच अडचण नसताना राजकीय हेतूने हेतुपरस्पर खोटी व दिशाभूल करणारी उत्तरे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष विरोधकांना देत असून विरोधकांची दिशाभूल करत असल्याने नगराध्यक्षांना नगराध्यक्ष पदावर राहण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक होण्याची वाट नगराध्यक्षानी न पाहता नैतीकतेच भान ठेवून नगराध्यक्ष अंकिताताई शहा यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजुनामा देण्याची मागनी राष्ट्रवादी नगरसेवक मखरे यांनी केली.

या पुर्वीच्या सभांमध्ये विरोधक आहेत की नाहीत या गोष्टीचा अनेकदा उलगडाच होत नसल्याने विकासाचे मुद्दे बाजूला सारून 60/40 चीच चर्चा आनेकांच्या तोंडुन ऐकावयास मिळत होती परंतु कालच्या सभेवेळी विरोधक आक्रमक झाल्याने सत्तेच्या नशेतील सत्ताधार्‍यांना विरोधकांनी घाम फोडल्याने सत्ताधार्‍यांवर सभाग्रह सोडण्याची वेळ आली. पुढच्या काळात मनमानी कारभाराला फाटा देवून अगोदर विरोधकांना विश्‍वासात घ्यावे लागेल.

यामध्ये मुख्याधिकारी यांनी सत्ताधारी व नगराध्यक्ष यांचेशी चर्चा करून कचरा डेपो जागा पर्यायी व्यवस्था म्हणुन इंदापूर नगरपरिषदेने ग.न.34/1/अ/2 क्षेत्र 2 हेक्टर 85 आर या जागेची 2014 साली शासनाकडे मागणी केलेली असून त्या जागेचे किंमत रक्कम 17 लाख 44 हजार 550 रूपये संबधित विभागाकडे जमा केलेले आहेत. रदर गट नं. जागेची पाहणी नगरपरिषद प्रशासनाने केली असता जागेत पाणी साचलेले असल्याने त्या पर्यायी जागेत कचरा डेपो करता येत नसल्याचे खोटे कारण दिले आसुन आम्ही या जागेची समक्ष पाहणी केली असता जागेमधे एक ठिकाणी थोडेशे पाणी साचल्याचे निदर्शनास आले व बाकी सर्व जवळ जवळ साडेतीन एकर जागा ही खोदकाम केलेल्या स्थितीत असून सर्व जागा कोरडी ठणठणीत व त्यामधे वेडी वाकडी झाडे वाढल्याचे दिसून येत आहे.

मुख्याधिकार्‍यांना घेराव
कचरा डेपोच्या प्रदूषणामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर दुषित प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने अनेक समस्यांना या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील लोकप्रतीनिधी म्हणुन मागील एक वर्षापासून या विषयी नगरपरिषद सभागृहात आवाज उठवून या प्रश्‍नाला वाचा फोडण्याचे व प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.

25 जानेवारीला दुपारी 4 वाजता इंदापूर नगरपरिषद आयोजित सर्वसाधारण सभेत याच प्रश्‍नांवर सभाग्रहात मी कचराडेपो पर्यायी जागेत स्थलांतर विषयी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता, सर्व प्रथम मुख्याधीकारी रामनिवास झंवर यांनी या प्रश्‍नांला बगल देऊन सभागृहातून बाहेर निघून गेले. त्यानंतर नगराध्यक्षांसह सर्व सत्ताधारी या प्रश्‍नांवर चर्चा न करताच सभागृहाबाहेर निघून गेल्याने माझा व राष्ट्रवादी सर्व नगरसेवकांचा संताप अनावर झाल्याने मुख्याधिकार्‍यांना घेराव घातल्याने मुख्याधिकारी व सत्ताधार्‍यांची पुरती कोडीं झाल्याने त्यांना या प्रश्‍नांचे लिखित उत्तर देणे भाग पडले.