पर्यावरणदिनानिमित्त केले वृक्षारोपण

0

चिंबळी- सामाजिक कार्यकर्ते मारूती बनकर यांनी सेवापुर्तीनिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत पर्यावरणदिनानिमित्त पद्मावत्ती मंदिरात वृक्षारोपण केले. ह.भ.प. गणेश महाराज वाघ यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पद्मावत्ती तरूण मंडळाचे अध्यक्ष समीर बनकर, संतोष सातव, नितिन बनकर, नंदू जाधव, काळूराम बनकर, संभाजी बनकर, ज्ञानेश्‍वर बनकर, शेखर जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, अमोल बनकर आदी उपस्थित होते. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे व ह.भ.प. गणेश महाराज वाघ यांच्या हस्ते मारूती बनकर यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.