पर्यावरणपुरक शाडूच्या मुर्तीची कार्यशाळा उत्साहात

0

युगंधरा फाऊंडेशनचे सलग दुसऱ्यावर्षी कार्यशाळेचे नियोजन
चाळीसगाव – बाप्पाच्या मूर्तीतून पर्यावरण स्नेह फुलविण्यासाठी तसेच पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून युगंधरा फाउंडेशनतर्फे देखील पर्यावरण पुरक शाडुच्या मातीची गणपती मूर्तिची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाचा आणि पर्यायाने पर्यावरणाचा तोल महिला सदस्यांनी बाळगल्याचे दिसून आले. यात शाडूची मुर्ती कशी बनवायची या संदर्भात राजश्री शेट्टी यांनी प्रशिक्षण देत उपस्थितांकरवी मुर्तीस नानाविध स्वरुपात आकार दिलेत. यावेळी महिलांनी सुंदर अशा गणपतीमूर्ती तयार केल्यात, प्रदूषणविरहित गणपती उत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीचीच गणपती मूर्तीची स्थापना करण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी केला.

यावेळी लहान चिमुरड्यांचा उत्साह ओसंडून राहिला, चांदण्यांनी भरलेल्या आभाळाकडे पाहतांना चिमुरड्यांचे मन भरुन आलेले दिसून येत होते. शाडूच्या मुर्तीरुपातील गणेशोत्सवाचा ‘वेलु’ गगनावरी जाऊन पोहोचल्याचे लहानग्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले तर लहान मुले श्रीगणेशाच्या भक्तीत पूर्णपणे डुंबून जातांना दिसून येत होतीत,ही किमया दुर्लक्षण्याइतकी लहानसहान नाही. ‘अ-आ-इ-ई’ ही धुळाक्षरे शिकण्यासोबतच त्यांनी गिरवलेली ही कला सर्वांनीच अनुभवली.

यावेळी लता जाधव, उषा पाटील, प्राजक्ता पाटील, अनिता रोकडे, सुनिता भोई, कविता शिंदे तसेच पोलिस अधिकारी वर्गाच्या महिला उपस्थित होत्यात. मोठ्या उत्साहात ही कार्यशाळा संपन्न झाली तर कार्यशाळेस आनंदाचे स्वरुप प्राप्त झाले होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी यामिनी पाटील, संगिता सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.