पर्यावरणपुरक हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

0
गगनगिरी, लेवाशक्ती, स्टार सखी मंच यांनी राबविला उपक्रम
पिंपरी : तुळस म्हणजे पवित्र अणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. आपल्या देशात तुळशीला फार महत्व दिले आहे. आयुर्वेदात तुळशिला फार महत्व दिलेले आहे. जसे अनाशापोटी तुळशीची 2/3 पाने खाल्यास स्मरणशक्ती वाढते. खोकला-कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात. कित्येक मोठया आजारांवर तुळशीपासून तयार केलेल्या औषधांचा उपयोग करतात. हाच उद्देश लक्षात घेऊन हळदी-कुंकवाच्या निमित्ताने संक्रांतीचे वाण म्हणुन पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी तुळशीच्या रोपांचे वाटप केले. तसेच प्लॅस्टिकबंदीमुळे भगिनींना कापडी पिशव्यांचे वाटप केले. अशा पध्दतीने पर्यावरण पूरक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडल्याची माहिती अध्यक्षा रेखा भोळे यांनी दिली. गगनगिरी विश्‍व फाउंडेशन, लेवाशक्ती सखीमंच आणि  स्टार सखीमंच यांच्यावतीने या पर्यावरणपुरक हळदी-कुंक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
विविध विषयांवर केले मार्गदर्शन
रेखा भोळे म्हणाल्या की, या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट स्त्रीशक्तीची ओळख, महिला सबलिकरणाचा प्रयत्न हे होते. स्त्रियांनी स्वतःला कसे ओळखावे, आपल्या स्त्रीशक्तीमधील जागर कसा निर्माण करावा, त्याचप्रमाणे स्वतःच्या पायावर कसे उभे राहत असताना कसे अडचणींना तोंड दयावे लागते याचे मुख्य मार्गदर्शन आपल्या फाउंडेशन व मंच्याच्यावतीने करण्यात आले. मनाची अद्भुत शक्ती अशा अनेक विषयांवर बोलण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा नकोर यांना आमंत्रित करण्यात आले होते. पब्लिक स्पिकींग, स्टेज डेअरिंग, पर्सनॉलिटी डेव्हलपमेंट, विदयार्थांसाठी कमी वेळात चांगला अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन लक्षझेप गुरूकुलचे प्रशिक्षक युवराज गायकवाड यांनी केले. स्वामींनी ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून गगनगिरी विश्‍व फाउंडेशनतर्फे महिलांसाठी टू-व्हिलर,फोर-व्हिलरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वामीनी ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका कालिंदा चव्हान यांनी ही माहिती दिली. गगनगिरी विश्‍व फाउंडेशनच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू व कपडयांचे स्टॉल ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य सहकार्य कांचन ढाके, विजया जंगले, चारूलता चौधरी, शितल नारखेणे, सुलभा धांडे, पल्ल्वी भोळे, पल्लवी पाटील, गायत्री चौधरी, प्रणाली चौधरी, प्रेरणा वारके, चंचल झोपे, मनिषा खर्चे यांनी केले.
चार सखी पैठणी विजेत्या
छोट-छोटे उद्योग करून महिलांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा याबद्दल स्थर सखी मंचाच्या प्रिती जगदाळे यांनी मार्गदर्शन केेले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग अध्यक्ष करूणा चिंचवडे, उपशिक्षण सभापती शर्मिला बाबर, अभिनेत्री आशानेगी हिरेमठ, खान्देशी अभिनेत्री पुषा ठाकूर, फॉर्च्युन हिलसिटी डेव्हलपर्स नितीन धिमधिमे आणि मकरंद पांडे, अथर्व डेव्हलपर्स संतोष दुबळे, विलास महाजन, विनोद कांबळे, लेवाशक्ती सखीमंच पुणे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष गौरी सरोदे, लेवाशक्ती सखीमंच पुणे अध्यक्ष विभावरी इंगळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात चार सखी पैठणी विजेत्या ठरल्या. सूत्रसंचालन न्युट्रीशियन मेघा जावळे यांनी केले.