‘पर्यावरणपूरक गणपती बनवा’ कार्यशाळेला उदंड प्रतिसाद

0

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने ‘शाडू मातीचे गणपती बनविणे’ या विषयावर चिंचवड स्टेशन येथील मनपा कन्या शाळेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सुनंदा कैलास बोरसे यांनी प्रथम तर संदीप वाघमोरे द्वितीय, जुनेद शहाबुद्दीन यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कार्यशाळेत 200 शिक्षकांनी तज्ज्ञ मार्गदर्शक फडणवीस, सुरेंद्र विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर व सुबक गणेशमूर्ती तयार केल्या.

वेबसाईट लिंकचे उद्घाटन
यशस्वीतांना आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक सचिन चिखले, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, परीक्षा परिषदेचे सहसंचालक सुधाकर तांबे, संघटनेचे नेते रवी पाटील, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर सहभागी सर्व शिक्षक व शाळांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे, उपसभापती विष्णूपंत नेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पदवीधर संघटनेच्या वेबसाईट लिंकचे उद्घाटन करण्यात आले.

30 शाळांचाही गौरव
संघटनेच्या ‘पट वाढवा ट्रॉफी जिंका’ या उपक्रमात सहभागी होऊन शालेय पट वाढविणार्‍या 30 शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वात जास्त इयत्ता पहिलीतील पट करणार्‍या मराठी माध्यम तीन शाळांना विनिंग ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक श्रीकांत चौगुले, डॉ. अविनाश वाळुज, डॉ. हेमलता सोळवंडे, डॉ. उर्मिला फलफले, एम. एल. येलगीर यांनाही सन्मानित करण्यात आले.