जळगाव। कर्नाटक राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्री गणेश मुर्तींवर कायमस्वरूपी बंदी घातली असून कर्नाटकमध्ये वॉटर अॅक्ट 1974 नुसार हा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही अशाच प्रकारचा कायदा करून पर्यावरण पूरक आणि जलप्रदुषण विरहीत शाडुमातीच्या मुर्तीविषयी शासनाने जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी. आणि श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात न करता जलाशयातच करावे अशी मागणी श्री कला केंद्रातर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदुषण मंडळाने गौरविलेले पर्यावरण पूरक शाडुमातीच्या श्री गणेश मुर्ती ‘श्री कला केंद्रा’ च्यावतीने प्रदर्शन आणि वितरण केंद्र अनुक्रमे 1 ऑगस्टपासून श्री नटवर सिनेमागृहाजवळ आणि 10 ऑगस्टपासून शिवराम गेस्ट हाऊस, टॉवरचौक येथे येणार आहे. तरी सर्व पर्यावरणप्रेमी आणि गणेशभक्तांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.