मुंबई :- दैनंदिन वापरातील प्लास्टिक वस्तूंना पर्याय उपलब्ध असलेल्या पर्यावरण स्नेही वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले.
यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.या प्रदर्शनात कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, लाकडी शोभेच्या वस्तू, खुर्च्या, नारळाच्या झाडाच्या पानांपासून बनविलेल्या प्लेटस, ताट, वाट्या, चमचे आदी घरगुती दैनंदिन वापराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. श्री. कदम यांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन वस्तूंची माहिती करुन घेतली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.