पुणे : ’पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठअभ्यासक डॉ. तारा भवाळकरयांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. तारा भवाळकर प्रामुख्याने वैचारिक लेखन करणा-या एक मराठी लेखिका आहेत. भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलमाध्ये भाग घेतलाआहे.