पर्यावरणाचा र्‍हास थोपवणे सोपे; प्रत्येकाने एक झाड लावावे

0

शहादा। वृक्षारोपणाची संख्या वाढविण्यापेक्षा मोजकीच झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले तरी पर्यावरणाचा र्‍हास थोपवणे सोपे होईल असे दीपक पाटील यांनी प्रतिपादन केले. पी.के.अण्णा पाटील यांनी वृक्ष दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला होता. त्यांनी लावलेल्या अनेक वृक्षांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे ते म्हणाले.

तालुक्यातील मलोणी ग्रामपंचायत, एनआयआर व्हिला, ग्रीन व्हॅली महात्मा गांधी समाजकल्याण मंडळाच्या पुढाकाराने गावात वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी डी. एच. पाटील, सुनील पाटील, शरद पाटील, संभू पाटील, प्रा. ईश्वर चौधरी, प्रा. शरद पाटील, सरपंच भिला भील, उपसरपंच भारत पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.