पाचोरा : पर्यावरणाचा र्हास होण्यासाठी मानवच जबाबदार असून प्रत्येक नागरिकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणे बंद करावे. प्रत्येक वर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, कुटूंब नियंत्रीत असावे.
यामुळे पर्यावरणाचा र्हास कमी होवून मानवाचे कल्याण साधता येईल. यामुळे प्रत्येकाने आपले घर व स्वतः पासूनच सुरुवात करावी. असे आवाहन मिनाक्षी दिवटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी गिरणा-तापी जणविकास पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डि.एफ.पाटील, प्रा. एल.बी. शर्मा, सुलोचना पाटील, प्रा. प्रतिभा परदेशी, कविता महाजन, डी.बी.पाटील, आनंद नवगिरे, दिनेश पाटील, उज्वला महाजन व्यासपिठावर होत्या.
उपस्थितांनी केले मार्गदर्शन
पाचोरा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आनंद नवगिरे यांनी तापी-गिरणा जन विकास संस्था गेल्या 17 वर्षापासून जनजागृती व लोक शिक्षणासाठी कामकरीत असून पर्यावरणाचे ओझे आपणच आपल्यावर ओढवून घेतले. नियोजनाच्या अभावामुळेच पाण्याचे संकट ओढवण्यात आले. कार्यक्रमात सरिता कुलकर्णी, क्षमा शर्मा, उज्वला महाजन, डॉ. राजेंद्र परदेशी, डॉ. संजय माळी यांनी वाढत्या पर्यावरणा मुळे होणार्या दुष्परिणामाची सखोल माहिती देवून यावर मात न केल्यास भविष्यात बिकट परिस्थीती निर्माण होईल असे सांगितले. कार्यक्रमास राजेंद्र प्रजापत, डॉ विकास केजरीवाल, संगिता नेवे, उपप्राचार्य एन. के. कुलकर्णी, महाविर अग्रवाल, यतीन मोदी, अशोक महाजन, पी.एस.वाणी, मोहन तळणीकर, आनंद दायमा, विकास चौधरी, भरत बजाज, रचना पंजाबी, दिव्या नेवे सह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थीत होते. सुत्रसंचालन यतीन मोदी तर आभार आनंद नवगीरे यांनी मानले.