पर्यावरणाच्या समृध्दीसाठी वृक्षारोपण आवश्यक – जिल्हाधिकारी

0

धुळे । गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे पर्यावरणाचा असमतोल निर्माण होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाच्या समृध्दीसाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त संवाद पर्व हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा समारोप सोमवारी धुळे शहरातील इंदिरा गार्डन परिसरातील वंदे मातरम प्रतिष्ठान येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका प्रतिभा चौधरी, कमलेश देवरे, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, तहसीलदार अश्‍विनीकुमार पोतदार, अमोल मोरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता कैलास शिंदे, डॉ. संदीप पाटील, कृपेश नांद्रे, गिरीश मराठे, प्रशांत मेखा, अमोल चौधरी, सागर चौधरी, ईश्‍वर वाघ, सुधीर बोरसे, नीलेश राजपूत, सचिन बोरसे, सुशील बोरसे, हरीश चौधरी, संजय ठाकरे, सुनील पाटील, बाळा शिनकर, सतीश पाटील, महेश कुवर, अभय पाटील आदी उपस्थित होते.

वृक्षारोपण
यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. धुळे जिल्ह्यात एक ते सात जुलै या कालावधीत 14.54 लक्ष एवढ्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. नागरिकांनी रोपांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वंदेमातरम प्रतिष्ठानचा वृक्षसंवर्धनाचा मनोदय अनुकरणीय असल्राचे जिल्हाधिकार्‍रांनी सांगितले.

देखाव्यातून देशभक्तिची प्रचीती
बलात्कारी रामरहिम बाबाला बेड्या तर शहिदांवर पुष्पवृष्टी आदी देखाव्रातून गणेशभक्तांचे डोळ्यांचे पारणेेफेडले. त्याचबरोबर मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, डॉ.होमी जहांगिर भाभा, आझादहिंद सेनेचेप्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतींना देखील गणेश विसर्जन मिरवणूकीतून उजाळा देण्यात आला. चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात निघालेल्या या मिरवणूका लक्षवेधी ठरल्या. गणरायांना निरोप देतांना विसर्जन मिरवणुकीवर कोणतेही विघ्न येवू नये म्हणून डोळ्यात तेल घालून धुळे जिल्हा पोलिस प्रशासन बंदोबस्ताला होते. पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिंमतराव जाधव, पीआय रमेशसिंह परदेशी, दिलीप गांगुर्डे, दत्ता पवार यांच्यासह पोलीस पथक विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. नगरसेवक गोविंद साखला हे स्वत: शहिदांच्या जिवंत देखाव्यावर पुष्पवृष्टी करत होते.