पिंपरी : महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागातर्फे जागतिक पर्यावरण दिना निमित्त आकुर्डी भाजी मंडईत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, सुनिल कदम व मिनल यादव, वैशाली काळभोर, खंडेराया भाजी मंङईचे अध्यक्ष सुरसेमामा अ क्षेत्रीय अधिकारी चितळे व सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, मुख्य आरोग्य निरिक्षक पानसे, पर्यावरण प्रेमी सुर्यकांत मुथीयान आदी उपस्थित होते.