पर्यावरण दिनानिमित्त ब्राम्हणशेवगे येथे वृक्ष पूजन

0

चाळीसगाव : सोमवारी 5 रोजी जागतिक पर्यावरण दिन संपुर्ण जगभरात साजरा करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे जागतिक पर्यावरण दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी व युवकांचा पर्यावरण रक्षणात सहभाग वाढावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ’स्वच्छता अभियान व झाडे लावा झाडे जगवा’ याबाबत संदेश देणारे टी-शर्टचे वाटप करण्यात आले. पर्यावरण दिनानिमित्त ब्राम्हणशेवगे गावातील सर्वात जुन्या वडाच्या झाडाचे ग्रामस्थांनी पुजन केले.

वृक्षांभोवती परिक्रमा घालून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची शपथ यावेळी गावकर्‍यांनी घेतली. पर्यावरण प्रेमी व लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे उपस्थितांना सांगितले. यावेळी सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. या प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर राठोड, ग्रामसेवक शाम पाटील,पोलीस पाटील राजेंद्र माळी, काँट्रॅक्टर संजय पवार, पद्माकर बाविस्कर, अनिल नेरकर, महादू नेरकर, नगराज पाटील, नाना पाटील, प्रभाकर पवार, विष्णु राठोड, बद्री राठोड, सुभाष शिर्के, राजेंद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर पारधी, प्रविण माळी, पिना पाटील, रमेश निकम, निसर्ग सेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.