जळगाव दि.7- केसीई सोसायटी संचलित अभियान्त्रिकी महाविद्यालयात नुकताच पाच जुन रोजी आँनलाईन जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. के. पी राणे यांनी झूम अप द्वारे मार्गदर्शन केले. तसेच यंत्र अभियान्त्रिकी विभागातर्फे पर्यावरणावर आधारित आँनलाईन २० गुणांची ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धा घेण्यात आली ज्यात पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत जवळपास १२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला . सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र त्यांच्या ई-मेल वर पाठविण्यात आले . यावेळी कँपस डायरेक्टर डॉ. एस. आर.सुगंधी, डॉ. पी.ए.विखार, सर्व विभाग प्रमुख , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.ए्म.डी. साळूंखे यांनी आभार मानले.