पर्यावरण रक्षणासाठी कागदी पाकीटांचे वाटप

0

नवापूर । पर्यावरणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आजचे बाल व युवा वर्ग प्रयत्न करू पाहत आहेत. दिवसेन दिवस पर्यावरणाचा होणारा बदल यामुळे त्याचा परिणाम पावसावर झाला आहे. श्री स्वामी समर्थ बालसंस्कार व युवा प्रबोधन वर्गाने पर्यावरणाचा र्‍हास थांबवा असे संदेश आपल्या उपक्रमातुन दिला आहे. यासाठी पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत बालसंस्कार व् युवाप्रबोधन यांचा तर्फे 5 जून पर्यावरण दिनानिमित नवापुर शहरातील 13 मेडिकल व् क्लिनिक या ठिकाणी कागदी पॅकेटस् देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

मेडीकल व क्लिनिकमधून औषधे कागदी पॅकेटस्मध्ये द्यावेत प्लास्टिक पिशव्याचा वापर करू नका अशी विनंती तथा आवाहन यावेळी श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र व् युवाप्रबोधन विभागाने केले. गावात सुमारे 1300 पैकेट्स चे वितरण करण्यात आले. सर्व पैकेट्स बालसंस्कार केंद्रातील मुलांनी बनविले होते. या उपक्रमांद्वारे पर्यावरणीय संदेशातुन मुले स्वयंरोजगारचे धड़े शिकले. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे.