पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्याची गरज

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील कुर्‍हा प्राथमिक आरोग्य केद्र कुर्‍हा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. अमितकुमार घडेकर यांनी वृक्षरोपणासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भगवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सोंडे, नितीन खिरळकर, गणेश भोई, रवी गोरे, भोला खिरळकर, कार्यकर्ते, वृक्षप्रेमी, केद्रांतील कर्मचारी उपस्थित होते.

तरुणांनी पुढाकार घ्यावा
सद्यस्थितीत वाढते औद्योगिकीकरण तसेच वाहनांच्या अमर्याद वापरामुळे प्रदुषणातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हे प्रदुषण निसर्गासाठी व मानवी जीवनासाठी घातक असून याला आळा घालण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता असून तरुणांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील डॉ. घडेकर यांनी केले. गावातील तरुणांनी एकत्र येत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपणासाठी ठराविक अंतरावर कुदळ फावडे हाती घेत खड्डे खोदले व यामध्ये विविध जातींची वृक्षे लावण्यात आली.