पर्यावरण रक्षणासाठी सरसावले ज्येष्ठ नागरीक ; भुसावळात वृक्षारोपण

0

महालक्ष्मी ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी घेतली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी

भुसावळ- दिवसागणिक पर्यावरणाचा होणारा र्‍हास व त्याचे भविष्यकालीन होणारे दृष्पपरीणाम पाहता शहरातील महालक्ष्मी ट्रस्टच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. केवळ उपक्रमापुरता ही बाब ठरू नये या साठी प्रत्येक ज्येष्ठावर झाड जगवण्याची तसेच त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीही टाकण्यात आली. जिल्ह्यात औषधी वनस्पती म्हणून कोकम, आवळा, तिरफळ, चिंच अशा झाडांचे वृक्षारोपण मोठया प्रमाणात झालेले नाही, अशी भावना महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी प्रसंगी व्यक्त केली.

पदाधिकारी म्हणाले पर्यावरण रक्षण काळाची गरज
रस्त्याच्या दुतर्फा पूर्वी वडाची झाडे होती ती ऊन-वादळी पावसातही अनेक वर्षे सावली देत उभी राहिली पण सध्याच्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे वादळी पावसात कोसळतात. त्यामुळे वाहतूकदेखील खोळंबते. या झाडांवर पक्ष्याचे घरटेदेखील कधी कोणी पाहिले नसेल तसेच उन्हाळ्यात पाणी शोषण करणारी झाडे पर्यावरणाला घातक आहेत. या शिवाय वड, पिंपळ, औदुंबर ही झाडे जैवविविधतेचे संरक्षण करतात. या झाडांवर पक्षी, कीटक, सापदेखील वावरतात तसेच उन्हाळ्यात ही झाडे पाण्याचे शोषण करीत नाहीत, उलट पाणी सोडतात, त्यामुळे शेजारील विहिरीलादेखील पाणी मिळते. त्यामुळे या भागात वृक्षारोपण सुरू करण्यात आल्याची माहिती महालक्ष्मी ट्रस्टच्या सदस्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील, समाज मंडळ अध्यक्ष दिनेश भंगाळे, सुपडू भंगाळे, प्रा.धिरज पाटील, विजय पाटील, दिलीप महाजन, संजय बर्‍हाटे, संदीप लोखंडे, मनोहर बर्‍हाटे, लिलाधर भारंबे, मधुकर लोखंडे, प्रकाश पाटील, किशोर पाटील, वासुदेव पाटील, दिलीप बर्‍हाटे, संजय नेमाडे, धर्मराज देवकर, गणेश किनगे, निवृत्ती महाराज, अमोल पाटील, चंद्रकांत पाटील, रामलाल गुप्ता, पद्माकर सपकाळे आदींच्या उपस्थितीत बहुपयोगी 12 प्रकारच्या वृक्षांची लावगड करण्यात आली.