चोपडा। गेल्या काही दिवसात देशातल्या अनेक भागांत साधारण पणे 40 अंश सेल्सिअसच्या आस पासच तापमानाची नोंद झाली आहे. पृथ्वी वरील दिवसें दिवस वाढत जाणारे तापमान, सागरी वादळे, महापूर, ढगफुटी, दुष्काळ या सर्व गोष्टींवरून हे तर निश्चित झाले आहे की आपण निसर्गावर किती अन्याय करीन आहोत.
वैज्ञानिक प्रगती ईतकेच पर्यावरणाच्या रक्षणाकडे लक्ष दिले असते तर आजही संकटे आली नसती. प्रत्येक नागरीकांनी पर्यावरण संवर्धनासाठी विचार करून त्यादृष्टीने पाऊल टाकायला हवे .पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे .पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे .1 जुलै ते 7 जुलै2017 या काळात 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फ राबविव्यात येत असून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वामी विवेकांनद युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी यांनी केले आहे.
वनविभाग राबविणार विविध उपक्रम
लागवडी करीता रोपे सुलभ रित्या उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गावा-गावात वनविभागाकडून 25 जून ते 5 जुलै या कालावधीत रोपे आपल्या दारी, वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी अभियान राबविण्यात येणार आहे. नुसते वृक्षारोपण करून चालणार नाही, संवर्धनही तितकेच महत्वाचे आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे. ए.सी. केबिन किंवा हॉल मध्ये बसून पर्यावरणाची चिंता काळजी करणार्या लोकांपेक्षा ग्रामपंचायती, शाळा, विविध संस्था, संघटना, महाविद्यालय मिळुन वृक्षरोपण व संवर्धन करून वाखण्या जोगे आहे, अशी माहितीही फाऊंडेशनचे अध्यक्ष शिंपी यांनी सांगितले.