चिखली :- पर्यावरण संवर्धन समिती आणि रिव्हर रेसिडेन्सी चिखलीच्या फेज 1 व 2 च्या सदनिका धारकांनी दोन दिवसांत घरातील प्लास्टिक ई-कचरा एकत्रित करुन ईसीएच्या स्वाधीन करण्यासाठी कापडी पिशवी भेट देण्यात आली.
इसिएच्या सुषमा पाटील यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ईसीएचे अध्यक्ष विकास पाटील, विकास आबले, सुषमा पाटील, सोनाली चिद्दरवार, प्रकाश जुकांतवार, दिनेश काहर, सोनिया साहू, रेणुका सोमनाथन, बाळू खाडे आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे यांनी यावेळी शून्य कचरा याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक सोसायटीमधून पुढाकार घेतला तर आपल्या शहराचे रुप बदलेले अशी आशा विकास पाटील व्यक्त केली. प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी 1250 सदनिका धारकांनी संकल्प केला आहे. यावेळी यावेळी जमा झालेले सर्व प्रकारचे प्लास्टिक कागद काचपत्रा पंचायत संस्थेच्या हवाली केले.