धुळे। शहराच्या पर्यावरण हितासाठी तसेच प्रदुषणास आळा बसवा यासाठी शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड व पर्यावरण हिताचे उपक्रम राबवावेत व स्वखुशीने त्यात सहभाग नोंदवा यासाठी दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणेता देसले हे पुढाकार घेत स्वाक्षरी मोहिम राबविणार आहेत. या स्वाक्षरी मोहिमेच उद्घाटन शहराच्या प्रथम नागरिक महापौर कल्पना महाले यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले. या मोहिमेतून धुळे शहर हरीत करण्याचा मानस देसले यांनी व्यक्त केला आहे.
समाजातील प्रत्येका सहभाग अपेक्षित
महाराष्ट्रात वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले आहे. नवीन रस्ते बनवतांना देखील वृक्ष तोड करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यातून पर्यावरण र्हास होत आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावण्याचा संकल्प करणे गरजे बनले आहे. पर्यावरण संरक्षण केल्यास वेळेवर पाऊस येण्यास मदत मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रीयपणे सहभागी होणे गरजेचे आहे.
शाळेपासून वृक्षरोपणाची संस्कार आवश्यक
वृक्षारोपणाची सवय लहानपणापासूनच शाळेतून लावयाला हवी. ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, युवक-युवती तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षरोपण व संवर्धन करावे यासाठी प्रणेता देसले कार्य करीत आहेत. स्वाक्षरी मोहिम राबवून सर्वसामान्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणार आहेत.
महापौरांनी केले कौतुक
या पर्यावरण संरक्षण उपक्रमात जास्तीत धुळेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रणेता देसले यांनी केले आहे. हरीत धुळे मोहिमेचे महापौरांनी कौतुक केले आहे. महापौरांनी देखील शहरवासीयांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण र्हास होत असतांना प्रत्येक नागरिकाने सामाजिक बांधीलकी जपत वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन केल्यास हरीत पट्टा वाढविण्यात मदत मिळणार आहे.