पर्रिकर राजीनामा द्या : विहिंप

0

नवी दिल्ली : गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासू देणार नाही. तुटवडा भासल्यास कर्नाटक आणि अन्य भागांतून गोमांस आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोवा विधानसभेत केले होते. पर्रिकरांचे या विधानामुळे हिंदूत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला असून, विश्व हिंदू परिषदेने तर पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.