पर्रीकर म्हणाले अंबानींसाठी मोदींनी खेळ केला; कालच्या भेटीनंतर राहुल गांधींचा दावा

0

नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांचा यात काहीच सहभाग नव्हता असे त्यांनीच आपल्याला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. अनिल अंबानींना फायदा मिळवून देण्यासाठी मोदींनी हा संपूर्ण खेळ रचल्याचेही त्यांनी सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी सध्या गोव्यामध्ये सुटीचा आनंद घेत आहेत. काल मंगळवारी त्यांनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली.

संबंधित बातमी-राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रीकरांची भेट !

केरळमध्ये जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले ‘गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल डीलशी माझा काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला.

दरम्यान, गोवा विधानसभेचे उपसभापती आणि भाजपाचे आमदार मायकर लोबो म्हणाले, राहुल गांधी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले होते. आजवर पर्रिकरांचा साधेपणा आणि विनम्रतेचे सर्व भारतीयांनी आणि गोवेकरांनी कौतुक केले आहे. ते खुपच साधे-सरळ व्यक्ती असून त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला अत्यंत गरज आहे. मात्र, राफेल मुद्द्यावर राहुल आणि पर्रिकर यांच्यातील संभाषणाची माहिती त्यांनी दिली नाही.