नाशिक- २ डिसेंबर रोजी नाशिक येथे “वेध नाशिक२०१८- जीवन की पाठशाला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात युवा उद्योजकांनी आपली यशोगाथा उलगडून दाखवली आहे. यात ठाणे येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मुक्त संवाद साधला. यावेळी उद्योजिका पल्लवी उटगी यांनी आपले मनोगत व्यक्त करत विचार मांडले.
पल्लवी उटगी ह्या उच्च शिक्षित आहेत. लहान मुलांसाठी वापरण्यात येत असलेल्या डायपरच्या धर्तीवर त्यांनी ‘सुपरबॉटम’नावाचे डायपर उद्योग सुरु केले आहे. डायपर हे एकदा वापरल्यानंतर फेकले जाते, मात्र सुपरबॉटम वांरवार वापरात येते. सुपरबॉटममुळे लहान मुलांच्या त्वचा देखील सांभाळली जाते. दररोज ३०० सुपरबॉटम विकले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिकचे डॉ. जयंत ढाके तसेच डॉ.नीना ढाके यांनी कार्यक्रमच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.