जळगाव । तालुक्यातील आसोदा-ममुराबाद जि.प.मतदार संघातून प्रतिनिधीत्व करणार्या पल्लवी जितेंद्र पाटील रा.आसोदा यांची ‘डीपीडीसी’ या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ग्रामीण गटात जि.प.सर्वसाधारण महिला गटातून बिनविरोध निवड झाली. जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत महत्वाच्या समजल्या जाणार्या या समितीत पल्लवी पाटील यांचेसह राष्ट्रवादीच्याच शिरसोली-बोरनार जि.प.सदस्य धनूबाई आंबटकर यांचीही बिनविरोध निवड झाली.
स्व.संभाजीआबा पाटील यांच्या भाचेसुन
सर्व पक्षीय गटनेत्यांनी समन्वयाने या प्रवर्गातील 8 महिला बिनविरोध झाल्या. पल्लवी पाटील ह्या ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले व कृउबाचे माजी संचालक स्व.संभाजीआबा पाटील यांच्या भाचेसुन असून मुंबई पोलीस दलात कार्यरत रवी देशमुख यांच्या सुविद्य पत्नी आहेत. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीतही त्यांची खेळी जिल्ह्यातील अनेकांच्या भूवया उंचावणारी ठरली होती. माजी आ.गुलाबराव देवकर, गटनेते शशिकांत साळूंखे, राष्ट्रवादी जिल्हा पदाधिकारी तसेच आसोदा ग्रा.पं.संचालक मंडळासह श्रीमती वैशाली भरत पाटील, लता शिवाजी पाटील आदींसह जिल्हा छावा संघटना, राष्ट्रवादी ग्रामीण आघाडी व आसोदा ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.