जळगाव- भुसावळ तालुक्यातील वांजाेळा येथील अंगणवाडीत पाेषण अाहारात अळ्या अाणि गाेम अाढळून अाल्याप्रकरणी ग्रामस्थांनी बाेलवल्यावरून महिला व बाल विकास अधिकारी अार. अार. तडवी गावात अाले हाेते. मात्र, त्यांनी तेथे ठाेस कारवाई करण्याएेवजी तेथून पळ काढला, तडवी हे पुरवठादाराची पाठराखण करत असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली अाहे.
सावकारे यांनी १४ सप्टेंबरला वांजाेळा येथील अंगणवाडीला भेट दिली हाेती. या वेळी पाेषण अाहारातील उपमा बनवण्याच्या साहित्यामध्ये अळ्या अाणि गाेम अाढळून अाली हाेती. या संतापजनक प्रकारानंतर सदस्या पल्लवी सावकारे अाणि गावातील ग्रामस्थांनी महिला व बाल विकास अधिकारी अार. अार. तडवी यांना वांजाेळा येथे बाेलवले हाेते. पुरवठादारावर कारवाई हाेणे अपेक्षीत हाेते, परंतु तडवी यांनी अंगणवाडी सेविकेवर खापर फाेडून सरळ पुरवठादाराची पाठराखण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.