‘पळवाट’ चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन

0

हडपसर । आव्हानाला साथ देत महिलांची निर्भरता व सुरक्षेवर यावर आधारित ‘पळवाट’ चित्रपट आहे. हा सामाजिक बांधिलकी जपणारा सिनेमा असल्याचे मत प्रशांत बोगम यांनी व्यक्त केले. या चित्रपटात नवीन कलाकारांना संधी देण्यात आली असून सामाजिक बांधिलकीचा संदेश यातून देण्यात आला आहे.

जीके ड्रीम सारा एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोगम, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान गलांडे, निर्माते गणेश कांबळे, सहदिग्दर्शक जगदीश चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले.