पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एक वर्षानंतर शोध

0

नवी मुंबई । तुर्भे येथील अल्पवयीन मुलीस मनोज सुरेश (बिल्लू) डुलगज (23) याने लग्न करण्याच्या उददेशाने फूस लावून पळवून नेले होते. त्याचा शोध घेत असताना त्याचे नातेवाईक यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. तपास करताना मनोज हा अपहृत मुलीस घेवून घरोंडा, हरियाणा येथे गेला असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एएचटीयू पोलीस पथक सलग दहा दिवस हरियाणा येथे जावून मनोज व अपहृत मुलीचा शोध घेत होते.

तपासा दरम्यान सिव्हील लाइन पोलीस स्टेशन करनाल, हरियाणा या पोलीसांकडून माहिती मिळाली की मनोज याने अल्पवयीन अपहृत मुलगी हीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्यानुसार तिचे वय 20 दाखवून तिच्याशी शिव मंदिरात लग्न केले आहे. अपहृत मुलगी ही गरोदर असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक करनाल हरियाणा यांना सदर मुलगी अल्पवयीन असल्याबाबतचे कागदोपत्री पुरावे दाखवून व योग्य ती रितसर कार्यवाही करून सदर अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला फूस लावून पळवून नेणारा मनोज डुलगज याला हरियाणा येथून ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी एक वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावला.