जळगाव-गाढोदा बस थाब्यांवर न येता परस्पर गावाबाहेरून बस नेल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे पळसोद बसच्या चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतसह नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत एसटी महामंडळाला ग्रां.पं.तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून एसटी बस ही गाढोदा बसथांब्यावर थांबते मात्र, गेल्या एक महिन्यापासून दिवभरातील ६ फेऱ्यांपैकी २ ते ३ फेऱ्यातील चालक हे परस्पर गावाच्या बाहेरून जातात. त्यामुळे विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांची गैरसाय होत आहे. २६ आॅगस्ट रोजी पळसोद मुक्कामास असलेली बस सकाळी वेळेच्या पूर्वीच गाढोदा गावाच्या बाहेरून निघून गेली़ त्यामुळे तब्बल १८ प्रवाश्यांची गैरसोय होऊन त्यांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागला. ] याबाबत एसटी महामंडळाची संपर्क साधून विचारणा केली असता बस पंक्चर झाली असल्याचे कारण सांगून वेळ मारून घेण्यात आली़ त्यामुळे परस्पर गावाबाहेरून बस नेणाºया चालकावर कारवाई व्हावी व नियमिथ बस थांब्यावर बस थांबावी अशी मागणी करण्यात आली आहे.