नागोठणे । 1984 पासून सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पळस ग्रामपंचायत काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश आले आहे. ग्रामपंचायतीमध्ये नऊपैकी सात सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे व दोन सदस्य शिवसेनेचे असले, तरी राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सेनेचे सदस्यसुद्धा आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे पळस ग्राम ंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत भालेकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षांतर्गत तडजोडीनुसार उपसरपंच तुकाराम कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर आज गुरुवारी सरपंच सीता वाघमारे आणि ग्रामसेवक राकेश टेमघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांची बैठक होऊन भालेकर यांची पळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली.
उपसरपंचांचा सत्कार
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला सरपंच सीता वाघमारे, सदस्य हिराजी शिंदे, तुकाराम कदम, दत्ताराम डाकी, रेश्मा जोशी, रंजना कदम, अर्चना घासे, विणा घासे, बेबी नाईक, महादेव डाकी, राजेंद्र शिंदे, सरपंच अनंत वाघ, निखिल मढवी, राम जोशी, संतोष भालेकर, रवींद्र पालांडे, धोंडुराम म्हात्रे, सचिन जोशी, शंकर कदम, अंकुश कदम, महादेव शिंदे, हिराजी शेलार, योगेश विचारे, महादेव साळुंखे, अशोक शिर्के, अशोक कदम, विठोबा शिर्के, प्रकाश पालांडे, कैलास नागोठकर, गणेश नागोठकर, विक्रांत घासे, नितीन राजिवले, लहू वाघमारे, परशुराम तांबोळी, अनिल डाकी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.