जळगाव। जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. येथे कृषी विभागा मार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये जैन इरिगेशनचे सिनीयर अॅग्रॉनॉमिस्ट डॉ. बी.डी. जडे यांनी कापुस पिकाविषयी तसेच सेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापना विषयी गप्पा गोष्टींच्या माध्यमातून विस्तृत असे मार्गदर्शन केले.
तसेच मागेल त्याला शेततळे, जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रम, कृषी यांत्रिकीकरण, मग्रारोहयो, रोहयो, फळबाग लागवड तसेच कृषी विषयक योजनांची माहिती देवून लाभ घेण्यास सांगितला. कार्यक्रमास कृ. प. सावळे, मंडळ कृषी अधिकारी नाठे, बी.टी.एम. राकेश पाटील उपस्थित होते. आर.जी. निकम, कृषी सहाय्यक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच गावातील लक्ष्मण पाटील, श्रावण पाटील, सरपंच हेमंत पाटील, माजी सरपंच संजय पाटील यांनी कार्यक्रमास सहकार्य केले तसेच ल.पा.चे जयंत महाजन उपस्थित होते.