पळासखेडे बुद्रुक येथे बचतगटांना मार्गदर्शन

0

बोदवड । महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बोदवड पंचायत समितीचे तालुका समन्वयक संदीप मेश्राम यांनी पळासखेडे बुद्रूक येथील महिला बचत गटाच्या प्रमुखांना बचत गटाच्या बचतीचे महत्व, बचत गटाची दशसुत्री, दप्तर पुर्ण करणे, कर्ज परतफेड करणे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. तसेच पळासखेडे बु. येथील बचत गटाच्या विविध दप्तरांची तपासणी केली. बचत गटाच्या बैठकीत 12 बचत गटाच्या प्रत्येक 10 महिला उपस्थित होत्या.

गावातील विविध गटाच्या सदस्यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भिमरत्न बचत गटाच्या त्रिशला राजू सुरवाडे, माता रमाई बचत गटाच्या वैशाली विनोद सुरवाडे, माता भिमाई बचत गटाच्या संगीत सुभाष सुरवाडे, तथागत गटाच्या वनमाला संदीप सुरवाडे, संघर्ष बचत गटाच्या उज्वला योगेश सुरवाडे, एकलव्य बचत गटाच्या भारती मंगल सुरवाडे, जयदुर्गा बचत गटाच्या उज्वला रंजन चव्हाण, महालक्ष्मी बचत गटाच्या कल्पना भास्कर साळुंके, एकता बचत गटाच्या यमुनाबाई साहेबराव पाटील, आदीवासी बचत गटाच्या रेखा मच्छिंद्र पारधी, जय बजरंग गटाच्या सरला चव्हाण आदी महिला उपस्थित होत्या. मासिक मिटींग यशस्वीतेसाठी अंगणवाडी मदतनीस निना चव्हाण यांनी सहकार्य केले. बचत गटाची बैठकीचे आयोजन जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत केले होते. 20 जून रोजी सायंकाळी 4 वाजता बैठक पार पडली.