पवनचक्की चोरली!

0

देहूरोड : किवळे भागात उघड्या माळरानावर असलेली 24 मीटर उंचीची पवनचक्की चोरट्यांनी पळवली आहे. या प्रकरणी राजेंद्र नरहरी कुंभार (वय 33 रा. बिबेवाडी पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए. डी. 30 प्रॉपर्टीज प्रा. लि. यांच्या मालकीच्या किवळे येथील परिसरात ही पवन चक्की होती. 27 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. 24 मीटर उंचीची, 25 किलोवॅटची पवनचक्की, 1 इन्व्हर्टर, 12 व्होल्टेजच्या 20 बॅटरी, 7 केबल, वायर रोप व एक मोटार असा तब्बल 31 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.