‘पवनाथडी’ अर्ज करण्यास मुदतवाढ

0

पिंपरी : महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणा-या पवनाथडी जत्रेत स्टॉल मिळण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवार (दि.15) पर्यंत अर्ज करण्याचे पालिकेने आवाहन केले आहे.

स्टॉलसाठी 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत अर्ज करण्याती मुदत दिली होती. परंतु, या वेळेत अनेक महिला स्टॉलसाठी अर्ज करु शकल्या नाहीत. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली होती.