पवनामाई जलपर्णीमुक्ततेचा 53 वा दिवस

0

पिंपरी-चिंचवड : नववर्षाच्या स्वागतासाठी पवनामाईचे पात्र जलपर्णीमुक्त व स्वच्छ करण्याचा निर्धार रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी केला आहे. यासाठी 53 दिवसांपासून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, शेळके फाऊंडेशन, पीसीसीएफ, भावसार व्हिजन, अशा विविध सामाजिक संस्थांतर्फे नदी स्वच्छतेचे काम केले जात आहे. नियोजनानुसार 31 डिसेंबर रोजी पुनावळे जवळील मुळशी तालुक्यातील जांबे गाव येथे सकाळी नऊ ते बारा यावेळेत जलपर्णी काढण्यात येणार आहे.

115 ट्रक जलपर्णी बाहेर
नोव्हेंबर महिन्यापासून दर रविवारी विविध क्षेत्रातील, विविध संस्थांचे सदस्य, विद्यार्थी पवनामाई उगम ते संगम या नदी स्वच्छतेच्या कार्यासाठी एकत्र येतात. पिंपरी-चिंचवड येथील घाटांवर दोरीच्या सहाय्याने जलपर्णी काढून टाकण्यात येते. यानुसार आत्तापर्यंत 115 ट्रक जलपर्णी नदीपात्रा बाहेर काढण्यात आली आहे. यामुळे पवना जलदिंडीसाठी सुद्धा यंदा जलपर्णीमुक्त नदीपात्राचे पूजन करण्यात आले.

दिवसेंदिवस वाढता सहभाग
अवघ्या काही माणसांपासून सुरु झालेल्या अभियानामध्ये 24 डिसेंबर रोजी दोनशे लोक सहभागी झाले. ज्यांनी जलपर्णी क ाढण्यासाठी हातभार लावला. या अभियानाद्वारे 31 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे वर्षाअखेर साजरा न करता पुढील वर्षीची तयारी म्हणून सर्वांनी या अभियानात सहभागी होत 2018 सालामध्ये स्वच्छ नदी पात्र सर्व शहरवासीयांना दिसावे यासाठी प्रयत्न क रावेत. हे अभियान जानेवारी महिन्यात देखील चालणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.